प्रा. तुकाराम पाटील

About the Author


प्रा. तुकाराम पाटील हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. प्रा.तुकाराम पाटील "नव महाराष्ट्र काव्य साहित्य कला संस्कृती परिवार", पिंपरी, पुणे संस्थापक असून म.सा.प. साहित्य शाखा पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष आहेत.
त्यांनी आजपर्यंत कविता, कथा, दीर्घकथा, एकांकिका, नाटक, कांदबरी, ललितगद्य, असे विविध साहित्यप्रकार हाताळले आहेत. त्यातून त्यांच्या ३५ साहित्यकृती, रसिकांसमोर आल्या आहेत. ह्या साहित्यकृतींमध्ये "निर्मोही" व "गोफ रेशमाचे" ह्या दोन गझलसंग्रहाचा अंतर्भाव आहे. त्याचबरोबर ते स्फूट लेखनसुद्धा करतात. यांना अनेक शिक्षण संस्थेतून व संघटनेतून "आदर्श शिक्षक" पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांना विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहेत.  
प्रा. तुकाराम पाटील