“Riveting . . . [हेडम्या ]
प्रा. तुकाराम पाटील यांचा 'हेडम्या' हा ग्रामीण कथासंग्रह आहे. कथांमधून ग्रामीण कौटुंबिक चित्राची सतत मांडणी केली आहे. या ना त्या प्रकाराने ग्रामीण कुटुंबाची पेच मांडणाऱ्या कथा म्हणून 'विजय' आणि 'शहाणपणाच्या गोळ्या' याच कथा डोळ्यांसमोर येतात.
'हेडम्या' ही एक चरित्रकहाणी आहे. बळी या शेतकऱ्याच्या घरी होणाऱ्या हेडमापासून ही कथा सुरु होते. वाडवडिलांच्या पायंडा, भावकीचे दडपण आणि देवाच्या कोपाची भीती यामुळे नाईलाज होवून बळीने हा हेडमचा मांड मांडला होता. हेडाम म्हणजे मोठ्या खर्चाची बाब. तीन बालगी विकूनच बळीला कशीतरी खर्चाची तोंडमिळवणी करावी लागते. ग्रामीण जीवनातील सरळसोट असणाऱ्या अनेक घटना या कथेमध्ये मनाला भुरळ घालतात.
हेडम्या