“Riveting . . . [पांढरा कावळा]
काही दिवसांपूर्वी शिरूर कासार जि. बीड या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा कावळा आढळल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये झळकल्या. कावळा साधारणतः काळ्या रंगाचा असतो. पण पांढऱ्या रंगाचा हा बगळा किंवा इतर कोणता तरी पक्षी असावा असा अंदाज बांधताना अनेक जण दिसले.
परिसरामध्ये या कावळ्याविषयी कुतूहल निर्माण झाले कुणी त्याला 'देवाचा कावळा' तसेच 'संकटी कावळा' म्हणायला लागले. एवढेच नव्हे तर कावळ्याला माणसाचा शत्रू समजू लागले. 'जगबुडी' येणार आहे. अघटित घडणार आहे. दुष्काळ पडणार आहे अशा प्रकारचा गैरसमज पसरला होता.
एरव्ही सुद्धा आपल्या कामाचा असेल तेव्हा म्हणजे दशक्रिया विधीला वगैरे कावळ्याची वाट पाहिली जाते. त्यासाठी ताटकळत बसावे लागते. तो येतो, पिंडाला शिवतो तेव्हा त्याला खूप महत्त्व प्राप्त होते. पण तोच कावळा एखादाला चोच मारून गेला तर तुला कावळा शिवलाय, बाजूला सरक असे म्हणून त्या कावळ्याला द्वेष केला जातो. एवढेच नाही तर 'कसा कावळ्यासारखा टपकला?' अशी वल्गना केली जाते.
मनात आले हा मिश्रहारी कावळा मानवाच्या किती उपयोगाच्या आहे अन्न साखळीतील, निसर्ग साखळीतील, पर्यावरण राखणाऱ्या दृष्टीने किती महत्त्वाचाआहे. त्या विषयी कुणी विचार का केला नाही? या निमित्ताने का होईना भारताचे भावी नागरिक या कावळ्याचा निश्चित गांभीर्याने विचार करतील अशी आशा मी बाळगतो.
पांढरा कावळा