“Riveting . . . [केशर बाग]
लेखिका शुभांगी पासेबंद यांच्या विविधरंगी विचारांच्या ठिपक्यांनी तयार झालेली सुंदर रांगोळी म्हणजे "केशरबाग" हे स्तंभलेखन संग्रहाचे पुस्तक होय !
हे पुस्तक एक वैचारिक स्फुट लेखन संग्रह आहे. केशराला जरी स्वतःची चव नसली तरीसुद्धा ते एखाद्या चांगल्या पदार्थला(कामाला) यशाचा रंग, चव व गंध आणतो तद्वतच विविध आयामांना स्पर्श करुन लेखिकेचे विचार ही या केशरबागेला एक वेगळा रंग, चव व गंध प्रदान करून जाते. वेगवेगळ्या हिंदी वा इंग्रजी काव्यपंत्कींचा सढळ हाताने लेखिकेने वापर केल्याने या पुस्तकाला एक वेगळा साहित्तिक बाज चढलेला दिसतो !
"केशरबागेत" मनाच्या गाभाऱ्यातली रूखरुखही हळूवारपणे आपल्याला जाणवत राहते.
केशर बाग