श्री. यशवंत गोसावी

About the Author


    यशवंत गोसावी हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते असून , महाराष्ट्रा सोबतच गुजरात ,कर्नाटक , गोवा अशा अनेक राज्यातील त्यांची व्याखाने खूप गाजलीत. २८ ऑक्टोंबर १९८६ रोजी जन्माला आलेल्या यशवंत गोसावी यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी हे असून ते गेल्या १० वर्षापासून पुणे येथे स्थायिक आहेत.वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून विचारपीठावरून सभा गाजवणार्या यशवंत गोसावी यांची पाच पुस्तके देखील प्रकाशित आहेत .

   व्याख्यानांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असणारे यशवंत गोसावी हे पुणे येथील AISSMS ह्या ऐतिहासिक शिक्षणसंस्थेत  कार्यरत असून ,"शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट" नावाची संस्था देखील चालवतात. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब , अनाथ मुले आणि असहाय्य वृद्धांना आधार देण्याचे काम ह्या ट्रस्टच्या वतीने सुरु असते .२८ ऑक्टोंबर २०१५ रोजी  नाशिक  शहरात ट्रस्टच्या वतीने आत्महत्याग्रस्त  शेतकरी कुटुंबांना १० लाख रुपये मदतनिधीचे वाटप करण्यात आले .२०१६ ह्या वर्षात ट्रस्टच्या वतीने १०० अनाथ बालके दत्तक घेतली असून त्यांच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी यशवंत गोसावी यांच्या शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टने  घेतलेली आहे.

   
समाजभूषणपुरस्कार, महंतगौरव पुरस्कार ,मराठाभूषणपुरस्कार, एकता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या यशवंत गोसावी यांची नेमणूक २०१२ साली महाराष्ट्र शासनाने "पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन महामंडळावर"  केली.
श्री. यशवंत गोसावी