श्री.मयूर राज शाह

About the Author


बी.कॉम,एल.एल.बी.,एमबीए (फायनान्स). शिक्षण नातेपुते या छोट्याश्या खेडेगावी झाले. अत्यंत गरिबीतून मार्ग काढत त्यांनी पुणे येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. छोटे छोटे लेख लिहण्याचा छंद जडला, ते लेख आसपासचे साप्ताहिक, व्हाट्सअप आणि फेसबुक वरवाचकांच्या आवडीचे बनले. व्यवसायावर वेगवेगळे लेख लिहता लिहता मुलांच्या आत्महत्या थांबाव्या हा विषय डोक्यामध्ये ठेवून त्यांनी लिखाण चालू केले आणि ह्याच लिखाणातून प्रवास या कादंबरीचा जन्म झाला. मयूरराज शहा हे एक उत्तम लेखक असून ते एक उत्तम वक्ते सुद्धा आहेत, अगदी लहान वयात त्यांनी व्यवसाय आणि कायदे या विषयावर बऱ्याच ठिकाणी व्याख्याने मांडली आहेत.
श्री.मयूर राज शाह