श्री.अरुण रणदिवे

About the Author


१९९२ साली टिळक विद्यापीठातून सामाजिक शास्त्रे विशारद बी.ए. पदवी संपादन केली. १९८३ पासून स्त्रीमुक्ती संघटना व अंधश्रद्धा निर्मूलनाला सुरुवात केली. १९८३ पासूनच दै. नवशक्ती, सुगावा (मासिक), पाक्षिकबहुजन भारत, साप्ताहिक राजकीय सत्तांतर, साप्ताहिक बहुजन नायक इत्यादी वृत्तपत्रांतून लेखन केले. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या माध्यमातून चमत्कारांचे सादरीकरण. वैज्ञानिक दृष्टीकोणाचा जाणीवपूर्वक प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी शाळा, कॉलेजे व एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची दोन/तीन दिवसीय शिबिरे घेतली. कॉलेज व शाळाबाह्य युवकांची कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेतली. विविध प्रकारच्या प्रासंगिक कार्यक्रमांतून व्याख्याने, चर्चा, परिसंवादात सहभाग.
२००६ पूर्णवेळ सामाजिक काम करता यावे यासाठी २००६ नोकरीचा राजीनामा दिला. २०१२ साली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्र व्यवसाय व पत्रकारिता (MCJ) ही पदवी संपादन केली. २०१३ पासून 'बहुजन समाज संस्कृतीचे आधारस्तंभ आणि सत्यशोधक' या दिनदर्शिकेचे संपादन. मार्च २०१७ पासून "सहारा" द्वैमासिकाचे संपादन.

श्री.अरुण रणदिवे