श्री. रमेश हरिश्चंद्र दाणे
About the Author
१९७५ पासून पूर्ण वेळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. आणीबाणीच्या काळात लढाऊ दैनिक स्वत्रंत्र भारत चालविण्याच्या प्रक्रियेत सहभाग . संपादकीय लेखन व जिल्ह्यात जनसंपर्क. सामाजिक, राजकीय आंदोलने, चळवळीवर प्राधान्यक्रमाने लेखन. समन्वयवादी विधायक पत्रकारितेचा आग्रह व त्यासाठी प्रयत्न. त्याबद्दल अ.भा. मराठी पत्रकार परिषदेने सुरु केलेला पां. वा. गाडगीळ शोध पत्रकारिता हा पहिला पुरस्कार प्राप्त शिवाय पत्रकारितेचे अन्य पुरस्कार प्राप्त वृत्तपत्रिका पदविका अभ्यासक्रमाचे केंद्रप्रमुख. राष्ट्र सेवादल धुळे त्याचबरोबर अनेक आंदोलनाणंमध्ये आणि सत्याग्रहामधे सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
महाराष्ट्र प्रदेश सर्वोच्च मंडळ मुंबई - कार्यकारिणी सदस्य, गीताई स्मारक समिती धुळे- सेक्रेटरी अशा विविध संस्थांसाठी कार्यरत. देशभरातील बहुतेक पर्यटन स्थळांना भेटी व त्यावर लेख.
विभागीव दर्पण पुरस्कार २००३, पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई पुरस्कार २००९.
