सौ. शांभवी मंगेश जोशी

About the Author


 या  संवेदनशील  लेखिका B.Sc. B.Ed करून २८ वर्ष अध्यापन क्षेत्रात काम केले. दरम्यानच्या काळात M.M.R.( Master of Mass Relation) ही पदवी घेतली. ह्यामधे विशेष गुणवत्ता प्राप्त झाली. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर काही दिवस मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे कार्य केले. त्यानंतर समुपदेशनाचा पदवीका अभ्यासक्रम पूर्ण केला. १२ वर्षापासून अहमदनगर मधे समुपदेशनाचे काम करत आहेत. विविध वृत्तपत्रातून प्रासंगिक लिखाण केले आहे. अहमदनगर मधील "समाचार" या स्थानिक वृत्तपत्रातून व्यसनाच्या प्रवासासंबंधी अभ्यासपूर्ण सदर दीर्घ काल चालवले होते.
विविध मासिकात, दिवाली अंकात, त्यांच्या कथा, कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या कथांचा "प्रकाशाच्या सावल्या" हा कथासंग्रह "विचक्षण डिजिटल पब्लिकेशनच्या" माध्यमातून प्रसिद्ध होत आहे. ह्या कथा जाणकार व रसीक वाचकांना नक्कीच आवडतील अशी खात्री आहे.
सौ. शांभवी मंगेश जोशी