डॉ. अशोक कौतिक कोळी

About the Author


हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी असून शिक्षणामध्ये (बी.ए. एम.ए. नेट एम.फिल.पीएच.डी.) ह्या पदव्या संपादन करून  प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीपासून साहित्य क्षेत्रात आवड असून आत्तापर्यंत अनेक पुस्तक प्रकाशित केली आहेत. कथा, कविता, कादंबरी, बालकविता आणि प्रासंगिक लेखन करून साहित्य क्षेत्रात प्रभुत्व प्राप्त केले आहे. तसेच सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर असतात.   

ग्रामीण जीवनाचे भेदक चित्रण करणारे नव्या दमाचे लेखक आहेत. 'पाडा' कादंबरीचे जळगाव आकाशवाणी केंद्रावरून अभिवाचन केले तसेच इयत्ता ६ वी मराठी बालभारती पाठ्यपुस्तकात "हिम्मत द्या थोडी" आणि "धूळपेरणी" या कवितांचा समावेश आहे

पुरस्कार:  

१. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे हस्ते भारत सरकारचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०१२.
२. राज्यशासनाचा  वि.स. खांडेकर उत्कृष्ट वाड्:मय पुरस्कार- २०११. 
३. राज्यशासनाचा गोपीनाथ तळवलकर उत्कृष्ट वाड्:मय पुरस्कार- २००७. 
४. शिवार प्रतिष्ठान, औरंगाबादचा शेतकरी साहित्य पुरस्कार- २०१२. 
५. खा. गोविंदराव आदिक ग्रामीण साहित्य पुरस्कार- २०११. 
६. कै. बळीराम मोगरे राज्यस्तरीय उत्कृष्ट कांदबरी पुरस्कार- २०११. 
७. मृत्युंजयकार शिवाजी सावंत कांदबरी पुरस्कार- २०११. 
८. आपटे वाचन मंदीर इचलकरंदीकर, उत्कृष्ट कांदबरी पुरस्कार- २०१०. 
९. कै. भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार- २००९. 
१०. दीनमित्रकार मुकुंटाराव पाटील वाड्:मय पुरस्कार- २००९. 
११. दहिवळ गुरुजी स्मृती साहित्य पुरस्कार- २००९. 
१२. अहमदनगर जिल्हा वाचनालयाचा राज्यपुरस्कार- २००८. 
१३. शा.न. पाटील वाड्:मय पुरस्कार- २००६. 
१४. सुदामजी सावरकर जनसाहित्य पुरस्कार- २००५. 
१५. पूज्य सानेगुरुजी साहित्य पुरस्कार- २००४. 
१६. गिरीजा किर कथासंग्रह पुरस्कार- २००४. 
१७. अस्मितादर्श वाड्:मय पुरस्कार- २००४. 
डॉ. अशोक कौतिक कोळी