डॉ.पी.बी.साबळे

About the Author


        डॉ.पी.बी.साबळे श्री.शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती महाराष्ट्र येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते गेल्या दहा वर्षांपासून अध्यापन करीत आहेत. श्री.शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथून बी.एससी. पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. श्री वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातून एम.एससी. पदवी प्रथम श्रेणीत मिळवून डॉ.डी.पी. वास्कर – व्ही.एन.एम.के.वी परभणीचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. पूर्ण केले. बागकामशास्त्रातील एनईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. पंचवीस शोधनिबंध आणि पस्तीसहून अधिक लोकप्रिय लेख प्रकाशीत केले आहेत.  अनेक रेडिओ आणि टेलिव्हीजन वार्ता, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम त्यांच्या नावावर आहेत.
       वाय.सी.एम.ओ.विद्यापिठ नाशिक बी.एससी.(ॲग्री आणि हॉर्ट.)च्या विद्यार्थ्यांचे संशोधन मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. आएडब्लयूई कार्यक्रमासाठी अधिकारी म्हणून कार्य केले असून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये व सभांमध्ये सहभाग नोंदविला आहे. 

डॉ.पी.बी.साबळे