श्री.आकाश खांडके

About the Author


       तंत्रज्ञान विषयात विशेष रस असून सध्या डिकेटीई अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील मोजक्या तरुण गूढकथालेखकांपैकी एक. वेगळी शैली आणि धक्कादायक शेवट यामुळे वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत. दैनंदिन जीवनाकडे वेगळेपणाने पाहण्याची असामान्य दृष्टी,भाषेवरील प्रभुत्व आणि वाचकाला खिळवून ठेवण्याचं कौशल्य यामुळे अल्पावधीत महाराष्ट्रभर पोचलेलं नाव म्हणजे आकाश खांडके.
       'अपरिचित' हा १ लाखांहून अधिक डाऊनलोड्स झालेला प्रसिद्ध गूढकथासंग्रह.तसेच 'क्षण' आणि 'चौकटीबाहेर' हे कथासंग्रह इ बुक स्वरूपात प्रसिद्ध झालेले आहेत. याशिवाय एका नामांकित वेबसाईट करिता एका गूढकथासंग्रहांचे ऑडिओ स्वरूपात प्रसिद्धीकरण झाले आहे. आतापर्यंत 'सोल्जर','कॉफी','इनसाईड आऊट','साहेब' या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या लघुपटांसाठी कथालेखनाचे काम केलेले आहे.
श्री.आकाश खांडके