श्री. महेंद्र गौरीकुमार बैसाणे.

About the Author


विद्युत अभियांत्रिकीची पदविका तसेच साहित्याची पदवी व व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी. एनएलपी प्रशिक्षित. 

आकाशवाणी-दुरदर्शनमध्ये १९९१ ते २०१२ दरम्यान अभियांत्रिकी विभागात कार्यरत. जानेवारी २०१२ मध्ये तंत्र निदेशक (सहाय्यक अभियंता) दुरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई या पदावरून शिक्षणासारख्या मुलभूत क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशाने स्वेच्छा निवृत्ती. २०११ मध्ये १०वी-१२वी च्या सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी मार्गदर्शन करणारे www.bharukaka.com हे महाराष्ट्रातील पहिले मराठी संकेतस्थळ सुरु केले. २०१३ साली ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी ‘गुरुकिल्ली’ या साप्ताहिक सदरचे लिखाण. ‘भारुकाकाची पत्रे’ व ‘टर्निंग पॉईंट’ या पुस्तकांचे लिखाण. १०वी-१२वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासाचे कॅलेंडर’ सह अनेकविध प्रेरणादायी साहित्याची निर्मिती. २०१४ व २०१५ साली नवी मुंबई विभागीय मंडळातर्फे परीक्षांदरम्यान ऑनलाईन ‘समुपदेशक’ म्हणून नियुक्ती. १०वी-१२वी विद्यार्थी व पालकांसाठी दुरदर्शन व इतर माध्यमांद्वारे मार्गदर्शन-समुपदेशन व कार्यशाळेंचे आयोजन. विविध वृत्तपत्र व मासिकांसाठी लिखाण. १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे करिअर मार्गदर्शन मिळावे यासाठी २००८ पासून पाठपुराव्याला २०१५ साली यश. २०१५ पासून महाराष्ट्रातील १०वीच्या सर्व म्हणजे सुमारे १५ लाखांच्या वर विद्यार्थ्यांची कलचाचणी शासनातर्फे दरवर्षी घेण्यात येत आहे. तसेच www.mahacareermitra.in हे विविध करिअर्सची माहिती देणारे संकेतस्थळही शासन मार्फत सुरु करण्यात आले.
श्री. महेंद्र गौरीकुमार बैसाणे.