प्रा. डॉ. ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी
About the Author
शास्त्रज्ञ, गुरु ( मेंटॉर ), तंत्रज्ञान हस्तांतरक, मार्गदर्शक आणि सल्लागार अभियंता (ऑटोमेशन, इंस्ट्रुमेंटेशन, ऊर्जा संवर्धन, क्लीन डेव्हलपमेंट मेलानिझम, बौद्धिक संपदा, पर्यावरण व अपारंपरिक ऊर्जा).
सरकारी व खाजगी क्षेत्रात उच्च अधिकारी पदांवर काम केले आहे .अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ म्हणून सन्मानित.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे अपारंपरिक ऊर्जा विषयक तज्ञ सल्लागार (महाराष्ट्र शासन ) यू . ए. ई. च्या हिज हायनेस शेख नाहयान यांचे ऊर्जा व पर्यावरण विषयक मुख्य सल्लागार. अमेरिकेच्या मॅक्सवेल रिचार्डसन चे मुख्य वैज्ञानिक सल्लागार .जगातील पहिल्या सौर उष्णतेवर आधारित वातानुकूलन तंत्रज्ञानाचा शोध लावणारे लावणारे शास्त्रज्ञ
विविध शोधांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे १८ पेटंट आहेत.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर १०४ पेक्षा जास्त पुरस्कार - सन्मान मिळालेले आहेत.
- जगातील १०० तरुण शास्त्रज्ञांपैकी सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ - स्टॉकहोम
- आंतरराष्ट्रीय युरोप गुणवत्ता पुरस्कार - World Trading Organization Outstanding
- सर्वोत्कृष्ट अभियंता - इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअर्स , इंडिया
- राजीव गांधी अक्षय ऊर्जा पुरस्कार - महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण संस्था
