श्री.अभिषेक अनिल दळवी

About the Author


बालवयात चांदोबापासून मनात निर्माण झालेली वाचनाची आवड कधी माझ्या आयुष्याच्या अविभाज्य भाग होऊन बसली कळली देखील नाही. अध्यनासोबतच लिखाणाची आवड आणि छंदामुळे नवयुवा लेखक म्हणून जगासमोर आले. भय कथा, गूढकथांच्या निमित्ताने मराठी साहित्य संपदेत त्यांचे पदार्पण झाले.
    नारायण धारप, रत्नाकर मतकरी यांसारख्या प्रतिभावंत लेखकांच्या अप्रतिम कथांमुळेच श्वास रोखून धरायला लावणाऱ्या वर्णनातून आणि काळजात धडकी भरायला भाग पाडणाऱ्या प्रसंगामधून त्यांच्या मनातही लेखनाची उर्मी निर्माण झाली आणि प्रारंभ झाला तो लघुभयकथा लेखनाला, ज्या फेसबुकद्वारे जगासमोर आणल्या गेल्या त्याच लघुकथामधून साकार झाल्या. पहिला वहिला कथा संग्रह तो म्हणजे "सर्पबळी" प्रकाशित झाला यानंतर आलेल्या वाचकांच्या उस्फुर्त प्रतिसादाने लिहला गेलेला हा दुसरा कथासंग्रह ज्यांनी हा कथासंग्रह प्रकाशित करण्याची संधी दिली ते म्हणजे "विचक्षण प्रकाशन" यांचे मार्फत ई-बुक प्रकाशित होत आहे.
श्री.अभिषेक अनिल दळवी