श्री.प्रकाश वि. साळवी

About the Author


बदलापूर येथे वास्तव करीत असून कवितांचा लळा वडिलांकडून मिळाला. बालपणापासूनच वाचन, लेखन, चित्रकला याची आवड होती.नामवंत लेखक शिवाजी सावंत, गो. नि. दांडेकर, पु. ल. देशपांडे, बाबा कदम, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, लता राजे यांची पुस्तके वाचून काढली आणि त्यातूनच लिखाणाला चालना मिळाली. छोट्या छोट्या कविता करण्याचा छंद लागला पण काही अडचणींमुळे त्यात खंड पडला आणि वयाच्या ६० व्या वर्षानंतर पुन्हा कविता करण्याचा छंद जडला आणि सन २०१४ नंतर कविता करू लागले. इलेक्ट्रॉनिकच्या जगात सोशल मीडिया द्वारे फेसबुक वर मराठी कविता पोस्ट करू लागले. वाचकांचा प्रतिसाद बघून कविता करण्याचा उत्साह वाढला.
श्री.प्रकाश वि. साळवी