श्री.रामराव कोंडुजी जुमळे

About the Author


यवतमाळ जिल्ह्यातील चौधरा या खेड्याचे मुळ रहिवासी आहेत. त्यांनी गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीत बि.कॉम पर्यंत शिक्षण घेऊन १९७१ साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात लिपीकाच्या पदावर नोकरीला लागलेत. नंतरच्या काळात पदोन्नती होत होत लेखाधिकारी पदापर्यंत पोहोचून अकोला येथे २००७ साली सेवानिवृत्त झालेत.
 नोकरीच्या सुरुवातीच्या काळात कम्युनिस्ट प्रनित ए.बी.बर्धन यांच्या नेतृत्वातील कामगार संघटनेत सक्रिय राहून महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. नंतरच्या काळात जे.एस.पाटील यांच्या नेतृत्वातील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेत सुद्धा सक्रिय राहून महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. त्याचप्रमाणे दिग्रस जि.यवतमाळ येथे 'बौद्ध कर्मचारी समाज सुधारक मंडळ’ नावाची पंजीकृत संस्था स्थापून त्यामाध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केलीत. नोकरीच्या काळात महाराष्ट्रात विदर्भपासून ते कोकणापर्यंत जेथे जेथे बदल्या झाल्यात त्या त्या ठिकाणी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे सामाजिक कार्य केले आहे.
याचबरोबर सामाजिक दायित्वची जाणीव ठेवून मा. कांशीरामजी यांच्या नेतृत्वातील बामसेफ व पे बॅक टू सोसायटी या संघटनेत तन, मन, धन अर्पण करून अंत्यंत सेवाभावी वृत्तीने सक्रिय सहभाग घेतला.
नोकरी आणि नंतरच्या काळात वाचन आणि लेखनाचा छंद जोपासला. त्यांचे लिखाण काही वृत्तपत्रात आणि मासिकात प्रकाशित झाले आहेत. त्यांनी त्यांच्या नोकरीपर्यंतच्या जीवनात घडलेल्या घटनांवर आधारित कथा गुंफल्या असून त्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या कथांपैकी 'बाबाची सही’ ही कथा लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत आली आहे. ह्या कथांच्या ब्लॉगवर वाचावे नेटके या सदरात सुद्धा समिक्षा आलेली आहेत. ते सध्या अकोल्याला स्थायिक झाले असून या परिसरातील बुद्ध विहारात धम्मावर प्रबोधन करीत असतात.
श्री.रामराव कोंडुजी जुमळे