श्री.विजयकुमार देशपांडे
About the Author
हायकू, चारोळ्या, कविता, वात्रटिका, भक्तीगीते,बालसाहित्य, विडंबने, विनोदी किस्से, लघुकथा, ललित निबंध, एकांकिका इ.विविध प्रकारचे साहित्य सोलापूर समाचार, संचार, विश्वसमाचार, केसरी इ. दैनिकात; सकाळ, स्वराज्य साप्ताहिकात; अबब, वसुधा, बुवा, शामसुंदर, अनुप्रिता, उत्तमकथा, आशय, किशोर, शब्दगंधार इ. मासिकात/दिवाळी अंकात; फेसबुक आणि स्वत:च्या ब्लॉगवर विविधप्रकारचे साहित्य प्रकाशित.
- "दैव जाणिले कुणी" हे नाटक प्रकाशित.
- पुणे आकाशवाणीवर बालकवितावाचन.
- सोलापूर आकाशवाणीकडून लेखनाची दखल.
- इंटरनेटवर स्वत:चा "लेखन प्रपंच" ब्लॉग.
- "चांदोबाचा दिवा" बालकवितासंग्रह [ दुसरी आवृत्ती ] प्रसिद्ध.
- "सखे तुझ्यासाठी" चारोळीसंग्रह [ दुसरी आवृत्ती ] प्रसिद्ध.
- "आभाळमाया" आणि "काव्यसुगंध" या दोन प्रातिनिधिक कवितासंग्रहात कविता प्रसिद्ध.
