श्री. निशिकांत सिध्दराज देशपांडे

About the Author


हे मुळचे अंबाजोगाईचे पण बरीच वर्षे औरंगाबादला व्यतित केली.गेल्या सहा वर्षा पासून पुण्यात कायम स्वरूपी स्थायीक आहेत.नोकरीसाठी स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधे पदार्पण केले होते.कारकून म्हणून भरती आणि अनेक शिड्या चढत चढत शेवटी उपमहा प्रबंधक( डेप्युटी-जनरल मॅनेजर ) या पदावरून २००४ साली निवृत्त झाले.
  वयाच्या ५७ व्या वर्षी काव्य लेखनास सुरुवात केली. वयाच्या ६२ व्या वर्षी मराठी गझल लिखाणास प्रारंभ केला."कल्पतरू" मराठी काव्य संग्रह,"आहट" हिंदी काव्यसंग्रह आणि दोन मराठी गझल संग्रह “रुतबा तुझ्यारुपाला" आणि  "रंग मावळतीचे" प्रकाशित झाले आहेत.ऑल इंडीया रेडिओ औरंगाबाद आणि पटियाला वरून काव्य वाचनाचे कार्यक्रम केलेले आहेत.दोन वेळेस पटियाला रेडियो केंद्रावरून केंद्रीय बजट प्रस्तावावरीलचर्चेत सहभाग घेतला होता.
   अनेक गझल मुशायऱ्यात,काव्य संमेलनात आणि साहित्य संमेलनात निमंत्रित कवि/शायर या नात्याने सहभाग त्यापैकी कांही सहभाग घेतलेल्या कार्यक्रमाचा तपशील असा :--

• सद्भावना विचारमंच व जनमानस प्रतिष्ठान तर्फे आयोजित काव्य साहित्य संमेलन-२०१० मधे निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला होता.
• मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलना निमंत्रित शायर म्हणून सांगली येथे सहभाग घेतला होता.
• रंगत-संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यमहोत्सव-२०१२ मधे निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला होता.
• शब्द साहित्य संमेलन २०१२ आलीबाग येथे निमंत्रित शायर म्हणून सहभाग घेतला होता.
• आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सातारा आयोजित "ये रे घना" मराठी काव्य मैफिलीत आमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला होता.
• मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २०१३, जळगाव यात निमंत्रित शायर म्हणून जळगाव येथे सहभाग घेतला होता.
• गारवा साहित्य संमेलन-२०१३, निमंत्रित शायर म्हणून सहभाग घेतला होता.
• पहिले शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन २०१४ बँकॉक, थायलंड येथे निमंत्रित शायर म्हणून सहभाग घेतला होता.
• "रंगवर्षा"-रंगारंग कवितेची मैफिल या सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात निमंत्रित शायर म्हणून सहभाग घेतला होता.
• जनमानस ग्रुप अंकूर साहित्य संघ, जळगाव आयोजित काव्य संमेलनात सहभाग घेतला होता.
• "गझल :सुरेश भटांनंतर" या डॉ. राम पंडित संपादित पुस्तकात माझ्या दोन गझलांच समावेश होता.
• मराठी गझल-सुरेश भटानंतर या गझल नवाज भीमराव पांचाळे संपादित पुस्तकात माझा दोन गझलांचा समावेश होता . या व्यतिरिक्त बऱ्याच कार्यक्रमात सहभाग . बऱ्याच गझला , कविता विविध वर्तमानातून आणि मासिकातून प्रसिद्ध . औरंगाबादचे प्रसिद्ध गायक डॉ . पराग चौधरी "रुतबा तुझ्या रुपाला " नावाने माझ्या गझलांच्या    गायनाचा सुश्राव्य स्वतंत्र बहारदार कार्यक्रम करतात.
श्री. निशिकांत सिध्दराज देशपांडे