डॉ.अनिरुद्ध बनहट्टी

About the Author


अनिरुद्ध बनहट्टी, यांचा  जन्म नागपूर येथे झाला. त्यांनी सिव्हील इंजिनियरिंग मधे पी.एच.डी. पदवी प्राप्त केली आहे. सध्या अनिरुद्ध बनहट्टी हे  जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट, वाघोली, पुणे  येथे  प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. तसेच सिव्हील इंजिनियरिंग मधे एम.ई. व पी.एच.डी. चे मार्गदर्शक आहेत. 
त्यांनी लेखनाची सुरुवात १९७५ मधे ‘राजस कथास्पर्धे’ पासून केली. त्यांच्या सायकेडेलीया या कथेला पारितोषिक मिळाले. ‘सत्यकथा’ व मौज दिवाळी अंक यामधे बऱ्याच कथा कविता एकांकिका प्रसिद्ध झाल्या. हंस, मोहिनी, नवल, रुपा, श्यामसुंदर, रविवारची धमाल जत्रा, अनुष्टुभ, गुलमोहोर, इब्लीस, रत्नावली, सासर माहेर, फुलपाखरू, छावा, कवितारती व इतर अनेक मासिकात त्यांचे विविध साहित्य प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र शासन नवलेखकास अनुदान योजनेत सायकेडेलीया संग्रह प्रसिद्ध झाले. आणि तसेच इतर ५ कथासंग्रह प्रसिद्ध झालेत. त्यांच्या अफवा एकांकिकेस मुंबई विद्यापीठ, युथ फेस्टिवल मधे, अखेरचे आश्रयस्थान एकांकिकेस सृजन स्पर्धेत या पारितोषिक मिळाले. 
डॉ.अनिरुद्ध बनहट्टी