डॉ. लिना देवधर

About the Author


डॉ. लिना देवधर गेली पन्नास वर्षे मायक्रोबायाॉलॉजिस्ट म्हणून काम करीत आहेत. एम.डी. पदवी मिळविल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास सर्व रुग्णालयात आणि बॉम्बे हॉस्पिटल मध्ये त्यांनी काम केले आहे. १९७७ साली लोकमान्य टिळक त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी मायक्रोबायाॉलॉजीचा विभाग स्थापन केला आणि तेव्हापासून १९९२ पर्यंत त्या विभागप्रमुख म्हणून काम करीत होत्या. एम.डी., एम.एस्सी. आणि पीएच.डी. करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रीय स्तरांवर त्यांचे जवळपास दोनशे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत

एड्स या विषयावरील त्यांनी लिहिलेल्या  मराठीतील पहिल्या  पुस्तकाला मराठी विज्ञान परिषदेतर्फे डॉ.रा. वि. जोशी पुरस्कार मिळाला आहे. लोकसत्ता या मराठी वृत्तपत्रातल्या स्तंभलेखांवर आधारित 'सांसर्गिक आजार' भाग १ आणि २ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 
डॉ. लिना देवधर यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल अनेक गौरव-पुरस्कार मिळाले आहेत. मायक्रोबायाॉलॉजी विषयांशी संबंधित अनेक संस्थांच्या त्या सभासदही आहेत. मुंबई विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ही मानद पदवी केली आहे. सन २००० मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिटयूट या संस्थेनेही त्यांना "वुमन ऑफ द इयर" हा सन्मान प्रदान केला आहे. निवृत्त्तीनंतर २००२ मध्ये पुण्याला स्थायिक झाल्यानंतर दीनानाथ, संजीवनी अशा प्रख्यात रुग्णालयात त्यांनी काम केले आहेत. आजही मिलेनियम नावाच्या एका खाजगी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीत त्या कार्यरत आहेत. 
डॉ. लिना देवधर