“Riveting . . . [मूल्यांचे मोती ] ‘मुल्यांचे मोती’ हा ललितलेखसंग्रह आहे. मूल्यांना
मोत्यासारखं जपणारं मन आपण घडवावं या हेतूने हे लेख लिहिले आहेत. काळ कितीही बदलला
तरी मानवी मूल्यं शाश्वत असतात. एकमेकांबद्दल सहानुभूती, प्रेम, आदर, जिव्हाळा, सहृदयता
या भावना कोणत्याही काळात आवश्यकच आहेत.
व्यक्तिमत्वाची ‘उंची’ गाठण्यासाठी उत्तूंगता काय
असते हे हिमालयाच्या शिखरांकडून, प्रसिध्दी च्या शिखरावर स्वकर्तृत्वाने चढलेल्या लोकांकडून
शिकावे लागते. त्यासाठी वयाने, ज्ञानाने, मानाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तिमत्वांबद्दल
‘आदर’ बाळगणे हे महत्वाचे मूल्य आहे. आपली सुसंस्कारित वाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा
अविभाज्य भाग आहे. म्हणून परिश्रमपूर्वक जिभेला चांगले वळण लावले पाहिजे. तसेच जीवनात
यशस्वी होण्यासाठी वेळेचा क्षणन् क्षण महत्त्वाचा असतो हे तत्व बालवयापासूनच रुजवावे
लागते. या लेखांमधून जीवन प्रवाही ठेवणे गरजेचे आहे, त्यासाठी जीवनाला ध्येय असले पाहिजे
असे सुचवले आहे.
मूल्यांचे मोती
Hardcover
Published by डॉ. सौ. स्नेहल संतोष चाटुफळे
February 06, 2018
| 73 Pages
| 17.6 MB
| 978-93-84740-29-8