“Riveting . . . [आई ] स्त्री ही जीवनाची गंगोत्री आहे. तिच्या अनेक गुणांनी
मातृत्व या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. हे ‘आईपण’ पशु-पक्ष्यांतही आहे.
वाघीण हरणावर क्रूरपणे हल्ला करते हे खरे; पण तीच वाघीण आपल्या बछड्यांना मायेने चाटीत
असते, प्राणपणाने सांभाळीत असते. चिमण्या पिल्लांना घास भरवून वाढवीत असतात; हे सारे
पाहिले की मातृत्व कसे संपूर्ण जीवनाला व्यापून आहे ते आढळून येते. या मातृत्वाचे विविधांगी
दर्शन ‘आई’ या पुस्तकाद्वारे घडते आहे.
हे पुस्तक अनेकांना धीर देणारं, वाटा दाखवणारं, अंतर्मुख
करणारं पुस्तक आहे. अनेक दीपज्योतींनी दीपमाळ जशी अनेक अंगांनी झळाळून उजळलेली दिसते,
तद्वत अनेक गुणांनी प्रकाशित झालेली स्त्रीरूपे या लेखनातून डोळ्यांपुढे उभी राहतात.
आई
Hardcover
Published by प्रतिभा देशपांडे
December 15, 2017
| 290 Pages
| 63.9 MB
| 978-93 -86740- 11-3