“Riveting . . . [काव्यसंध्या ] कविता म्हणजे मनातील भावनांना उघड स्वरूपात काव्यरुपात मांडणे. शब्दा शब्दात गुंफणे. या काव्यसंग्रहात सर्व मीश्र कविता सादर केल्या आहेत. कवितेत तुम्ही वाचाल "शोधतो आहे माणुसकी" दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरण झाले आणि मनातील कवी जागा झाला. इतक्या निघृण पद्धतीने हे बलात्कार प्रकरण होते की माणसात माणुसकी शिल्लक राहिली आहे की नाही याचीच शंका वाटू लागली आणि ती माझ्या काव्यातून कागदावर उतरली गेली.
"शोधतो आहे माणूस ज्यात माणुसकी शिल्लक आहे.
जिकडे तिकडे श्वापदेच भरली आहेत,
वासनेचा चाललेला नंगा नाच
ना नात्याचा घरबंध, ना माणुसकीचा वास,
जगतो आहे फक्त म्हणून चालू आहे श्वास..."
त्या भावना माझ्या काव्यातून प्रगट झाल्या आणि कविता फुलत गेली एका पाठोपाठ एक कविता करीत गेलो. या प्रवासात अनेक प्रेम कविता, भावनिक कविता, भक्ती कविता विरह कविता सामाजिक कविता माझ्याकडून लिहिल्या गेल्या त्या साऱ्या कविता या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहात वाचावयास मिळतील. आपण या पुस्तकाचे स्वागत कराल यात शंका नाही. हे पुस्तक तुमच्या हाती देतांना विश्वास आहे की तुमचा भर भरून प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा.
काव्यसंध्या