“Riveting . . . [व्हिटा-१२]
'व्हिटा-१२' हा १२ लघुकथांचा संग्रह वाचकांच्या सेवेत सादर होत आहे. या लघुकथा संग्रहातील 'नियती' ही कथा आजच्या वेगवान जीवनात प्रिय लोकांनी काळजीमुळे दिलेल्या सूचनांकडे केलेल्या दुर्लक्षांमुळे जीवावर व प्रिय कुटुंबावर कोणती आपत्ती ओढवू शकते हे सांगण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. 'दुरावा' ही कथा स्वतःच्या अभिमानासाठी सुखी संसाराचा उंबरठा ओलांडणाऱ्या सुशिक्षित तरुणीची कथा असून उशिरा सुचलेलं शहाणपण काहीही कामाचं नसतं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 'शेवटचा स्टॉप' आणि 'विश्वास' या करुणकथेत मित्र आणि त्यांच्या पत्नीच्या दगाबाजीचा उहापोह केलेला असून सदर घटना टाळण्यासाठी अशांपासून सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.
या सर्व बाराही कथा स्थळ-काळाच्या विशिष्ट अवकाशात बांधलेल्या, नानाविध घटनांनी समृद्ध असणाऱ्या, प्रसंगांच्या तुकड्यांनी गुंफलेल्या पारंपारिक कथानकप्रधान, अशा लघुकथा आहेत. कथेतील घटना मनोबाह्य असोत की मानसिक असोत, पण स्थळ, काळ, पात्रेयांनी घडलेली असते. या घटकांच्यामुळे येणारी कथात्मकता हे कथेचे आद्यअंग असते.
कथांची सुरुवात वेगानं ठेवून प्रत्येक कथेच्या शेवटी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर समाज प्रबोधनही होईल याचाही प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी मनापासून खात्री आहे. व्हिटा-१२
Hardcover
Published by श्री. नरेश सदाशिव धोटकर (भावसार)
October 26, 2017
| 100 Pages
| 5.40 MB
| 978-93 -86740- 15-1