“Riveting . . . [प्रतिबिंब ]
सदर कथासंग्रहातील प्रथम कथेत एखादी व्यक्ति आपल्यावर झालेल्या अन्यायाचा किती भयानक रूपात बदला घेते आणि गुन्हेगारांना शिक्षा करते हे दर्शविले आहे. द्वितीय कथेत कोणतेही दुष्कृत्य कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी ते नियति नेहमीच उजेडात आणण्याचा प्रयत्न करते. ते जगापासून कधीही लपुन राहत नाही हे सहज लक्षात येईल. तृतीय कथेत एक सामान्य गृहिणी केवळ प्रेम, विश्वास आणि हिम्मतीच्या जोरावर एका क्रूर, राक्षसी शक्तिचा कशाप्रकारे सामना करते हे दर्शविले आहे. कित्येक वेळा काही छोट्या छोट्या गोष्टीही किती रहस्यमय आणि भयानक असतात. चौथ्या कथेत अशाच एका वस्तुचे वर्णन केले आहे जिच्यामुळे एका सुखी दांपत्याच्या आयुष्यात किती मोठी ऊलथा पालथ होते. तरीही ते यातून कसे बचावतात याचे विस्तृत वर्णन केले आहे.
"प्रतिबिंब" हा कथासंग्रह वाचून तुम्हाला थोडे जरी भय जाणवले तर लेखक म्हणून मी माझे काम चोख बजावले आहे असे मी समजेन. या कथा वाचकांच्या पसंतीस उतराव्यात हीच सदिच्छा. प्रतिबिंब
Hardcover
Published by श्री.अभिषेक अनिल दळवी
October 26, 2017
| 52 Pages
| .
| 978-93-86740-24-3