“Riveting . . . [पिवळ्या बाभळी]
बाभळींकडे कुणी आनंदी नजरेनं बघत नाही. कारण बाभळींना काटे असतात. म्हणून बाभळींजवळ फारसं कुणी फिरकत नाही.
हे खरं असलं तरीबाभळींचाही एक दिवस, ऋतु असा येतो की, बाभाळीच्या टपोऱ्या, गोलाकार पिवळ्या फुलांचं लावण्य, बाभळीची ती मोहोर श्रीमंती
डोळ्यांना भरून घ्यावीशी वाटते. तेव्हा तिच्या काट्यांचा कुणी विचारही करीत नाही.
बाभळीचं लदबदलेलं सौंदर्य तनामनात भरून घ्यावसं वाटतं. माणसाच्या जीवनात जशी सुख-दुःख येतात तसेच बाभळीला
काटे-फुले. माणसाच्या जीवनाला बाभळीचा उपमा दिली तर ती वावगी ठरू नये. संदीप गवई यांनाही खरं म्हणजे असेच
अभिप्रेत आहे.
बाभूळ ही कथा झाडांविषयी बेईमान झालेल्या माणसाची आहे. जे
झाड आपल्याला सावली देतं, शुध्द् हवा देतं, लाकूडफाटा देतं, त्या झाडाविषयी बद्रीनाथचा
कृतघ्नपणा गौतमला पाहवत नाही. खंर म्हणजे बाभळी बद्रीनाथच्या मालकीची असते.
मजुरांकडून तो तोडून घेत असतो. मात्र झाडं तोडणं हे पाप आहे अशा सात्विक भावनेनं
गौतम झाड तोडू देण्यास विरोध करतो. याला दुसरं कारण असंही की, त्या बाभळीशी त्याच्या जीवनातील
सुखद आठवणी जुळलेल्या असतात. तोडलेल्या जागेवर गौतम दोन लिबांच्या झाडाचे रोपटे लावून
झाडांविषयी आपली आत्मियता प्रकट करतो. झाडांविषयी सद्भावना असणारी 'बाभूळ' ही कथा चिंतन करायला लावणारी आहे.
संदीप गवई यांच्या सर्वच कथा वाचनीय असून वाचकांच्या मनाची
पकड घट्ट धरून ठेवणाऱ्या आहेत. या कथा विषय, आशय सोडून इतरत्र सैरभैर होत नाहीत
हे या कथांचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पिवळ्या बाभळी
Hardcover
Published by श्री. संदीप निवृत्ती गवई
June 30, 2017
| 228 Pages
| 45.8 MB
| 978-93-84740-30-4