“Riveting . . . [ओरिसा] इतिहासात मानवाने महत्त्वाच्या विविध घटनांची नोंद करणे, भविष्यातील
लोकांसाठी संदेश देणे, आपल्या भावना, आपले तत्वज्ञान याची नोंद करणे यासाठी वाड्:मयातून,
दस्तावेजामधून आणि चित्रे, शिल्पे आदिकलाकतीमधून जागोजाग प्रतीकांचा वापर केलेला आहे.
काही पर्यटनस्थळे अतिशय आकर्षक आणि चकाचक राखलेली असतात. आजुबाजूच्या
सर्वसाधारण परिसरात एखादे दिव्य बेट उगवावे अशी वाटतात. काळाचा एक तुकडा चुकून मागे
राहिल्यासारखी.
विनोदांचे फटाके फोडत फिरणार्या सुहास्यवदन, तलमवस्त्रांकित पर्यटकांच्या
उत्साहाने तिथले वातावरणच भारले जाते आणि तो परिसर उत्फुल्ल, जादुई होऊन जातो. काळ
थबकून ते दिव्य, आनंददायी क्षण संपूच नयेत असे वाटते.
हे सारे पाहायचे असेल, त्या काळात जाऊन अनुभवायचे असेल तर ओरिसा
राज्यातील अनेक स्थाने पाहायलाच हवीत. पण, त्यामागील इतिहास काय आहे, दंतकथा किती मनोरंजक,
आकर्षक आणि अद्भूत आहेत हे जाणून मग ओरिसा कसे पाहावे यासाठी श्री. सुधीर कांदळकर याचे
स्वानूभवी “ओरिसा” हे पुस्तक जरुर वाचावे. ओरिसा
Hardcover
Published by श्री.सुधीर वासुदेव कांदळकर.
September 10, 2018
| 127 Pages
| 27.9 MB
| 978-93-86740-17-5