सौ. अर्चना सुनील लाड

About the Author


एम.ए.,डी. एड. शिक्षण झाले असून प्राथमिक आश्रमशाळा, तुरची येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. ध्यास फाउंडेशन पलूस, येथे अध्यक्षा आहेत. तसेच  नटराज कला, विकास मंच, पलूस येथे सचिव आहेत. 'ध्यास' विद्यार्थी कवी संमेलनच्या माध्यमातून साहित्याची आवड व ओळख निर्माण करून देणे.   

साहित्यिक कार्य क्षेत्रात विविध वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंकातून कविता, लेख, कथा प्रसिद्ध झाले आहेत. विविध साहित्यसंमेलन व कवीसंमेलनात सहभागी. तसेच "मोकळा श्वास" कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. "चुकलो रे धन्या"  या कथेस अखिल भारतीय शेतकरी साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या विश्वस्तरीय लेखन स्पर्धेत तृतीय क्रमांक. ग्रामीण कथाकथनकार- भूक, घरोघरी, चोरांचे दिवस या कथांचे सादरीकरण.    

प्राप्त पुरस्कार

१. श्री. स्वामी समर्थ बहुउद्देशीय  संस्था सांडगेवाडी   यांच्या तर्फे –कविरत्न पुरस्कार.    
२.महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण  सांगली    यांच्यातर्फे - जिल्हास्तरीय  आदर्श  शिक्षिका पुरस्कार .
सौ. अर्चना सुनील लाड