डॉ.भास्कर गायकवाड

About the Author


       B.Sc.(Agri), M.Sc.(Agri), Ph.D.(Agri) प्रमुख शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र 1995 पासून कार्यरत आहेत. त्यांनी  सेंद्रीय शेती , शाश्वत ऊस उत्पादन  इत्यादी पुस्तके, शेतीविषयक अनेक लेखांचे प्रकाशन केले असून  20 हून अधिक ऑडिओ व्हिडीओ सी.डी. ची मार्गदर्शनामध्ये निर्मिती झाली आहे.
       सी.ए.पी.ए.आर.टी. च्या प्रकल्प मूल्यांकनकर्ता, भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या प्रकल्प मूल्यांकनासाठी तज्ञ,  कृषी मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित कृषि व कृषि व्यवसाय प्रशिक्षण केंद्रासाठी नोडल अधिकारी म्हणून कार्यसंपन्न केले आहे.
       राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम कृषी विज्ञान केंद्र  विकसित केले जे देशामध्ये आदर्श मॉडेल आहे. या कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविल्या गेल्या आहेत.  
       98-99 साठी राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कृषि विज्ञान केंद्र पुरस्कार,  वर्ष 2010 साठी झोनल लेव्हल सर्वोत्कृष्ट कृषि विज्ञान केंद्र पुरस्कार, 2011 साठी राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कृषि विज्ञान केंद्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या 2013 वर्षासाठी कृषी रत्न पुरस्कार  अशा पुरस्कारांनी सन्मानीत आहेत.

डॉ.भास्कर गायकवाड