डॉ.श्री. ललित अधाने

About the Author


औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

शिक्षण एम.ए.,नेट.,पीएच.डी.,सतरा वर्ष अध्यापनाचा अनुभव. 'रत्नाकर मतकरी यांचे नाट्य लेखन:स्वरूप व चिकित्सा' या विषयावर पीएच.डी. साठी संशोधन. 'कुणबी बाप' हा काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहास साने गुरुजी प्रतिष्ठानचा 'कुसुमाग्रज काव्य पुरस्कार',यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचा 'यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार'. 'वाङ्मयीन प्रवृत्ती: तत्वशोध' (डॉ.दादा गोरे गौरवग्रंथ) या समीक्षाग्रंथाचे संपादन. तसेच विविध वाङ्मयीन नियतकालिके, वर्तमानपत्रांमधून लेखन. राष्ट्रीय सेवा योजनेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 'आदर्श कार्यक्रमाधिकारी पुरस्कार' यांसह विविध पुरस्कार. शाळा, महाविद्यालये, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून, राज्यस्तरीय व विभागीय साहित्य संमेलनातून काव्यवाचन, 'हास्य तरंग व अश्रुंचे रंग' या कार्यक्रमाची निर्मिती व सादरीकरण. विविध चर्चासत्रे व कार्यशा‍‌ळांंमधून संशोधनपर लेखांचे वाचन. चित्रपट गीत लेखन. काही ध्वनिफिती प्रकाशित झालेत.   
डॉ.श्री. ललित अधाने