श्री. प्रकाश हरिश्चंद्र पाटील

About the Author


लेखक हे वसई येथील रहिवासी आहेत. सन २०१५ ते २०१८ या कालावधीकरिता कोकण मराठी साहित्य परिषदेचे वसई शाखेचे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत .
"नकळत" हा कविता संग्रह २०१४ मध्ये प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्र टाईम्स व वसईतील स्थानिक वृत्तपत्रांमधून लेखन केले आहे. समाजातील व्यंगावर भाष्य करणारी "माझा दादा बिल्डर झाला " ही मराठी आगरी-कोळी लोकगीतांची व्हिडिओ सीडी २०१२ मध्ये प्रकाशित झाली आहे.
२०१२ मध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मैरेथोनसाठी हिंदी गीत (थीम सॉंग) लिहून संगीतबद्ध केले होते. "प्रेमसंदेश" हा चारोळी संग्रह व "रहस्यकथा" संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत- दहा वर्षे वसई पूर्वेतील गोखिवरे ग्रामपंचायतीचे सदस्य होते. गोखिवरे विकास मंडळाचे खजिनदार होते. भूमिपुत्र श्रमिक कामगार संघटनेचे ते विद्यमान खजिनदार आहेत. तसेच विविध आरोग्य, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम आयोजनामध्ये सक्रिय सहभाग.
पुरस्कार :
१. मुक्तांगण साहित्य सेवा, बीड या संस्थेचा राज्यस्तरीय कथालेखनाचा विशेष पुरस्कार(१९८६).
२. "नकळत" हा कविता संग्रहास २०१४ सालचा सहयोग साहित्य पुरस्कार.
३. सन २०१५ -१६ चा एकता कल्चरल अकादमीचा समाजसेवेचा "यशवंतराव चव्हाण" स्मृति
श्री. प्रकाश हरिश्चंद्र पाटील